साऊथमधील पॉवर कपल म्हणून अभिनेत्री समंथा प्रभू आणि नागा चैतन्य लोकप्रिय होते. यांची जोडी प्रचंड पसंत केली जात होती. परंतु त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला होता.
समंथा आणि नागा चैतन्यने आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत आपण विभक्त झाल्याची माहिती दिली होती.
त्यांनतर आता सोशल मीडियावर समंथा आणि नागा चैतन्यमध्ये पुन्हा पॅचअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
यामागे कारणसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग आहे. अभिनेत्री समंथा प्रभूने आपल्या इन्स्टाग्रामवरून घटस्फोटाची पोस्ट डिलीट केली आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर अशी अफवा पसरली आहे, की ते दोघे पुन्हा एक झाले आहेत.
परंतु या जोडप्याकडून अद्याप अशी काहीच माहिती मिळालेली नाही. त्यामुळे ही केवळ अफवा असल्याचं समजलं जात आहे.
समंथाने ती पोस्ट का डिलिट केली याचं नेमकं कोणतंही कारण अजून समजलेलं नाही.