साउथ सुपरस्टार समंथा रुतप्रभू अख्कीनेनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही चर्चा होतेय तिच्या इन्स्टाग्रामवरील नावात केलेल्या बदलामुळे.
नुकताच समंथाने आपलं इन्स्टाग्रामवरून नाव बदलत फक्त समंथा रुतप्रभू ठेवलं आहे, तर पतीचं आडनाव म्हणजेच 'अख्कीनेनी' हे हटवलं आहे.
समंथाने हा निर्णय का घेतला याबद्दल अद्यापही काहीच माहिती समोर आलेली नाहीय.
समंथाच्या या निर्णयाने चाहते मात्र मोठे हैराण झाले आहेत. आणि विविध अंदाज बांधत आहेत.
समंथाचं पतीसोबत भांडण झाल्याच्या चर्चादेखील सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
समंथाने 2017 मध्ये साउथ सुपरस्टार नागार्जुनच्या मोठ्या मुलाशी म्हणजेच अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केलं आहे.