साऊथची लेडी सुपरस्टार आणि फॅमिली मॅन 2 मुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे समंथा अक्खीनेनी होय. ही अभिनेत्री चित्रपटांसोबतचं आपल्या पर्सनल लाईफमुळेसुद्धा चर्चेत असते. समंथाने नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यासोबत लग्न केलं आहे. मात्र अलीकडे या जोडप्यामध्ये बिनसल्याची चर्चा सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी समंथाने आपल्या सोशल मीडियावरून अक्खीनेनी हे सरनेम हटवलं होतं. त्यामुळे या चर्चांना उधान आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार या दोघांचं अगदी 4 वर्षातच संपुष्टात आल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र या दोघांकडून कोणतीचं अधिकृत माहिती मिळाली नव्हती.
नुकताच समंथाने आपल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या आणि पतीच्या नात्याबद्दल संवाद साधला. तिने आपलं नातं तुटलं आहे या प्रश्नावर उत्तर देत म्हटलं आहे, मी अशा फालतू प्रश्नांची उत्तरे देत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे. त्यामुळे मलासुद्धा माझं मत मांडण्याचा हक्क आहे.
समंथाने पुढं म्हटलं आहे, 'मी कधीही कॉट्रोवर्सीसमोर आपलं डोकं खराब नाही करून घेत. अशा चर्चा म्हणजे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातील एक छोटासा भाग असतो'.
मात्र मीडिया रिपोर्टनुसार नागा चैतन्य त्या फोन आणि प्रश्नांपासून स्वतःचा बचाव करत आहे, जी त्याच्या आणि पत्नी समंथाच्या संदर्भात असतात.
आपल्याला सांगू इच्छितो की, समंथा आणि नागा चैतन्याच्या मध्ये काहीतरी बिनसलं आहे, याबद्दल अजून कोणतीचं अधिकृत घोषणा झालेली नाहीय.
नागा चैतन्य आणि समंथाने 6 ऑक्टोबर 2017 मध्ये लग्न केलं होतं. त्यांनी प्रथम दक्षिण भारतीय आणि नंतर ईसाई पद्धतीनं हे लग्न केलं होतं.