साऊथची लेडी सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीचं व्यावसायिक आणि खाजगी आयुष्य नेहमीच चाहत्यांसाठी कुतूहलाची बाब आहे.
साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत समंथा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
समंथा साऊथमध्येच नव्हे तर जगभरात लोकप्रिय ठरत आहे. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
समंथाच्या प्रत्येक पोस्टला युजर्सकडून भरभरुन प्रेम मिळत असतं.तिच्या पोस्ट प्रचंड व्हायरल होत असतात.
इन्स्टाग्राम समंथाहे तब्बल 23.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.
समंथा आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमधून कोट्यावधी रुपये कमावते.
ती एका ब्रँडच्या इन्स्टाग्राम जाहिरातीसाठी 2 ते 3कोटी इतकं मानधन घेते.
अभिनेत्री महिन्यातून केवळ दोन ते तीन वेळा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रँडची जाहिरात करताना दिसून येते.