साऊथमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत पहिलं नाव अभिनेत्री नयनताराचं आहे. या अभिनेत्रीला लेडी सुपरस्टारदेखील म्हटलं जातं.
अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून आपल्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे.
नुकतंच साऊथ अभिनेत्री नयनताराने फिल्ममेकर बॉयफ्रेंड विघ्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली आहे.
लग्नानंतर या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
त्यांनतर आता अभिनेत्रीच्या हनीमूनचे फोटो चर्चेत आले आहेत.
नयनताराचा पती विघ्नेशने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या हनीमून ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री सध्या थायलंडमध्ये आपला हनीमून एन्जॉय करत आहे. याठिकाणचे सुंदर-सुंदर फोटो तिच्या पतीने शेअर केले आहेत.
यामध्ये अभिनेत्री आपल्या पतीसोबत रोमँटिक अंदाजात दिसून येत आहे..