बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
सोनम कपूर काही महिन्यांपूर्वीच आई बनली आहे. अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला आहे. तिच्या मुलाचं नाव वायू असं आहे.
सोनम कपूर लेकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच आपल्या सासरी पोहोचली आहे.
सोनम कपूरचं सासर दिल्ली आहे. पती आनंद अहुजाचं दिल्लीत अतिशय आलिशान घर आहे.
सोनमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या सासरच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीचं सासरचं घर इतकं आलिशान आहे की ते एखाद्या राजवाडयासारखं भासत आहे.
लेक पहिल्यांदाच घरी येत असल्याने आनंद आणि कुटुंबाने घर अतिशय सुंदर असं सजवलं आहे.
सोनमच्या सासरच्या घराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
सोनम नेहमीच आपल्या रॉयल लाईफस्टाईलसाठी ओळखली जाते.
सोनम कपूरचं मुंबई आणि विदेशातील घरसुद्धा इतकंच आलिशान आहे.
सोनम कपूरच्या घरातील इंटेरिअर अनेकांना पसंत पडत आहे.