बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या भावंडांच्या किती जवळ आहे हे सर्वानांच माहित आहे. आज अभिनेत्री मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा करत आहे.
सोनम कपूरनं रक्षाबंधनचं औचित्य साधत सख्खा भाऊ हर्षवर्धन कपूर ते चुलत भाऊ अर्जुन कपूरपर्यंत आपल्या सर्व भावंडांसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
सोनमने शेअर केलेल्या फोटोंपैकी काही फोटो पाहिलेले आहेत परंतु काही फोटो हे पहिल्यांदाच समोर आले आहेत.
या सर्व भावंडांमध्ये सोनम कपूर ही सर्वात मोठी बहीण आहे. त्यामुळे ती सर्वांसोबतच जास्तीत-जास्त कनेक्ट आहे.
आपल्या लग्नातील काही खास फोटोंसह अभिनेत्रीने आपल्या बालपणीचे देखील फोटो शेअर केले आहेत.
सोनम कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत, एक खास पोस्टदेखील लिहली आहे.
अभिनेत्रीने लिहलंय, 'माझ्या भावानों तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात याचा मला प्रचंड आनंद आहे. मला माहितेय पार्टीत रंगत कशी आणायची आणि धम्माल लोकांचा ग्रुप कसा बनवायचं हे मी तुम्हाला शिकवलं.परंतु आता आपल्या मुलांचा ग्रुप बनताना पाहण्याची प्रतीक्षाच माझ्याकडून होत नाहीय'.
अभिनेत्रीने पुढं लिहलंय, ' तुम्ही दिदी म्हणायला नकार दिलेल्या या तुमच्या मोठ्या बहिणीचं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे'.
नुकतंच 'कॉफी विथ करण' मध्ये करण जोहर सोनम कपूरला तिच्या भावांविषयी प्रश्न विचारतो. तुझ्या मैत्रिणींपैकी अर्जुन कोणासोबत झोपला आहे किंवा रिलेशनशिपमध्ये आहे. सोनम म्हणते की मी त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. मात्र माझ्या सर्व भावांमध्ये कोणीही शिल्लक नाही जे माझ्या फ्रेंडसोबत झोपलं नाहीये. सोनम कपूरचे हे शब्द ऐकून अर्जुन कपूरला धक्काच बसला होता.