आज देशात सर्वत्र रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यामध्ये मराठी कलाकारसुद्धा मागे नाहीत. मराठी कलाकारांनी आपल्या भावंडांसोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेसुद्धा आपल्या भावला राखी बांधत फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री भाग्यश्री चिर्मुले आणि चैत्राली चिर्मुलेने एकमेकींना राखी बांधत हा सण साजरा केला आहे.
तितिक्षा तावडेनेसुद्धा आपल्या भावासोबतचा गोड फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री अन्विता फलटणकरनेसुद्धा आपल्या भावंडांसोबत रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आहे.
तन्वी मुंडलेनेसुद्धा आपल्या दादाला राखी बांधली आहे.
अभिनेत्री प्रिया बापटनेही आपल्या स्टोरीला आपल्या दादासोबतच एक फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री मोनालिसा बागलने आपल्या बहिणीला राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलं आहे.
अक्षया देवधरने आपल्या भावला तसेच सहकलाकार अमोल नाईकलासुद्धा राखी बांधली आहे.
रिंकू राजगुरुनेसुद्धा आपल्या भावासोबतच एक फोटो शेअर केला आहे.