आपला देश स्वतंत्र होवून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याच्या या सुवर्ण महोत्सवी आज सगळीकडे उत्सवाचं वातावरण पहायला मिळत आहे. अशातच मराठीमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनंही अनोख्या पद्धतीनं स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सोनाली कुलकर्णी अमेरिकेत हटके अंदाजात पहायला मिळाली. यावेळीचे फोटो तिनं इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं साधारण 5000 मराठी माणसांसोबत अमेरिकेत कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
या कार्यक्रमात आपली संस्कृती, कला, भाषा, विचारांची देवाण घेवाण करताना सोनालीनं उपस्थिती दर्शवली होती.
या कार्यक्रमातील अनुभवाविषयी सोनालीनं पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
विदेशात आपली संस्कृती, कला, भाषा, विचारांची देवाण घेवाण करण्याच्या अनुभवाविषयी अभिमान वाटत असल्यातं सोनालीनं म्हटलं आहे.
'अमेरिकेत लैहराया परचम' म्हणत सोनालीनं साडीतील सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
सोनालीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक कमेंट येत आहेत.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सध्या ती तिच्या लग्नाच्या फोटोंमुळे चर्चेत आहे.
सोनालीनं कुणाल बेनोडेकरसोबत केलेल्या विविध पद्धतीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.