मराठीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या सौंदर्याने सर्वांनां घायाळ करत असते.
साडी असो वा वेस्टर्न आउटफिट्स सर्वच पोशाखांमध्ये सोनाली सुंदर दिसते.
अभिनेत्रीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये अभिनेत्री ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये फारच खुलून दिसत आहे.
अभिनेत्रीच्या निरागस हास्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
सोनालीने गेल्या काही महिन्यांपूर्वी आपलं वजन मोठ्या प्रमाणात कमी केलं आहे.
या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चाहते तिचं प्रचंड कौतुक करत आहेत.
अभिनेत्री सतत वेगवेगळ्या लुकमध्ये फोटोशूट करुन चाहत्यांचं लक्ष वेधत असते.