अभिनेत्री सोनाली कुलकर्णीन चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे लग्नाची तारीख पे तारीख पडत होती म्हणून सोनालीने एक योग्य निर्णय घेत अंमलातही आणला. पाहा फोटो
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वाढदिवासाच्या दिवशीच आणखी एक गोड बातमी दिली.
गेल्या वर्षी कोरोना काळात घरच्या घरी सोनालीने साखरपुडा उरकला होता. वाढदिवसाच्या सुमारासच त्याची घोषणाही केली होती.
आता पुन्हा सोनालीने वाढदिवसालाच लग्न झाल्याची घोषणा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला.
गेल्या वर्षी कोविड बंधनांमुळे तिला कायम आहे. त्यात सोनालीचा नवरा लंडनला असतो. त्यालग्नबंधनात अडकता आलं नाही. वर्ष उलटलं, तरी परिस्थिती मुळे लग्नाची तारीख पे तारीख पडत होती.
सोनालीने फेसबुक पोस्ट करत तिच्या छोटेखानी लग्नाची गोष्ट शेअर केली आहे.
कुणाल बेनोडेकर या लंडनमधल्या व्यावसायिकाशी सोनालीने 7 मे रोजी लग्नगाठ बांधली.
कुणालचे आई-वडील लंडनला असतात. सोनालीचे भारतात आणि सोनाली कोरोनामुळे दुबईत अडकली होती. कुणालही तिथे होता.
सोनाली आणि कुणालने या परिस्थितीत नियमांचा विचार करत आणि अनावश्यक खर्च टाळत एका मंदिरात मोजक्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या. वरमाला, मंगळसूत्र आणि कुंकू या तीन गोष्टी करून लग्न लागलं. (File Photo)
आता सविस्तर विधीवत लग्न जेव्हा परिस्थिती निवळेल त्या वेळी दोन्ही घरच्या मोठ्यांच्या उपस्थितीत पुन्हा लावता येईल, असंही सोनालीने लिहिलं आहे. (File Photo)