मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अशी ओळख असणारी सोनाली कुलकर्णी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या अभिनेत्री आपल्या गुड न्यूजमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून आपल्या हॉरर 'व्हिक्टोरिया' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होती.
यादरम्यान अभिनेत्रीने अनेक मुलाखती दिल्या होत्या.या मुलाखती बऱ्याच चर्चेत आल्या होत्या.
दरम्यान नुकतंच अभिनेत्री 'पटलं तर घ्या' या टॉक शोमध्ये आली होती.
यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक गुड न्यूज दिली आहे.
खरं सांगायचं तर सोनाली कुलकर्णीला या शोमध्ये एक टास्क देण्यात आला होता.
ज्यामध्ये तिला एखाद्या व्यक्तीला गुड न्यूज द्यायची होती.
दरम्यान अभिनेत्रीने आपल्या मॅनेजरला फोन लावत आपल्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत सांगत गुड न्यूज दिली आहे.