बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चित्रपटांसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असते.
नुकतंच सोनाक्षीने मुंबईत एक आलिशान घर खरेदी केलं आहे.
अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये सोनाक्षी आपल्या नव्या घरात फर्निचर सेट करताना दिसून येत आहे.
सोनाक्षीने नव्या घराचे फोटो शेअर करत लिहलंय, 'माझं डोकं रोपटे,भांडी, गाद्या, कव्हर,उशी, सिंक, बेसिन, चमचे, यांसोबत फिरत आहे. घर बनवणं सोपं नाहीय'.
सोनाक्षी सिन्हाने अगदी सुंदर असं सी फेसिंग आलिशान फ्लॅट खरेदी केलं आहे.
चाहते आणि सेलिब्रेटी सोनाक्षीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.