NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Smriti Irani Daughter Wedding : मुलीच्या लग्नासाठी स्मृती इराणींनी बुक केला 500 वर्षे जुना शाही किल्ला, पाहा Photos

Smriti Irani Daughter Wedding : मुलीच्या लग्नासाठी स्मृती इराणींनी बुक केला 500 वर्षे जुना शाही किल्ला, पाहा Photos

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शनेल इराणी हिचे शाही लग्नाचा सोहळा 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत जोधपूरमध्ये होणार आहे. स्मृती इराणींनीही आपल्या मुलीला राजकन्येप्रमाणे पाठवणीची तयारी केली आहे. याअनुसार शनेलचे लग्न खींवसर किल्ल्यावर शाही पद्धतीने होणार आहे.

110

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शनेल इराणी हिचे शाही लग्नाचा सोहळा 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत जोधपूरमध्ये होणार आहे. स्मृती इराणींनीही आपल्या मुलीला राजकन्येप्रमाणे पाठवणीची तयारी केली आहे. याअनुसार शनेलचे लग्न खींवसर किल्ल्यावर शाही पद्धतीने होणार आहे.

210

शनेल इराणीचा 2021 मध्ये अर्जुन भल्लासोबत साखरपुडा झाला आहे. अर्जुनने जोधपूर आणि नागौर दरम्यान असलेल्या खींवसर किल्ल्यावर शनेलला लग्नासाठी प्रपोज केले होते. आता याच किल्ल्यात दोघांची लग्नगाठी बांधली जाणार आहे. जाणून घेऊया या, खींवसर किल्ल्याबाबत.

310

खींवसर किल्ला राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील खींवसर गावात आहे. हा किल्ला 500 वर्ष जुना आहे. जोधपूर आणि नागौरच्या मध्ये हा किल्ला आहे. तर थार वाळवंटाच्या पूर्वेकडील काठावर येतो. हा किल्ला 1523 मध्ये राव करमसजी यांनी बांधला होता. जोधपूरच्या राव जोधा यांचा ते आठवे पूत्र होते.

410

15व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याला एका बाजूला वाळवंट आणि दुसऱ्या बाजूला तलाव आहे. येथे तुम्ही दिवसा वाळवंट सफारीवर जाऊ शकता आणि ताऱ्यांखाली रात्री आरामात आणि निवांत वेळ घालवू शकता.

510

या किल्ल्यावर सोनेरी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासारखा आहे. यामुळे या किल्ल्याला रोमँटिक वातावरण मिळते. किल्ल्याच्या आतही अनेक सुरेख विभाग आणि सुविधा आहेत.

610

खींवसर किल्ल्यामध्ये 71 खोल्या आणि स्युट आहेत. येथे 4 फूड आणि बेव्हरेज आउटलेट्स आहेत, म्हणजे रेस्टॉरंट-कॅफे इ. तसेच येथे 2 मेजवानीची (बँकेट) आणि बैठकीची ठिकाणे आहेत. तसेच आलिशान झोपड्या असलेली 18 गावे आहेत. गावात 2 खाद्य आणि पेय दुकाने आणि 1 मेजवानी आणि बैठकीचे ठिकाण आहे.

710

येथे राहताना तुम्हाला अनेक आरामदायी आणि लक्झरी सुविधा मिळतील. येथे एक फिटनेस सेंटर म्हणजेच जिम आहे. एक स्विमिंग पूल आणि स्पा आहे. येथे तुम्हाला प्रवासातही मदत मिळेल. याशिवाय तुमच्या सुरक्षेची 24 तास काळजी घेतली जाईल.

810

या किल्ल्यातील खोल्या तीन प्रकारात विभागल्या आहेत. स्टैन्डर्ड रूम, ज्यामध्ये तुम्हाला पारंपारिक डिझाइनसह एक खोली मिळेल. नोबल चेंबर्स, यामध्ये तुम्हाला हाताने तयार केलेल्या फर्निचरसह एक सुंदर रूम मिळेल. आणि रॉयल चेंबर्स म्हणजेच लॅव्हीश रूम्स मिळतील.

910

येथे खाण्यासाठी अनेक रेस्टॉरंट आणि कॅफे आहेत. खींवसर किल्ल्यावर द लास्ट सेंटिनेल कॅफे, फतेह महल, वंश, द रॉयल रिफ्युज आणि फोर्ट रॅम्पर्ट्स अशी ठिकाणे आहेत, याठिकाणी तुम्ही कुटुंबासह शाही शैलीत जेवू शकता.

1010

स्मृती इराणी यांची मुलगी शनेलबद्दल सांगायचे तर ती व्यवसायाने वकील आहे. 2021 मध्ये तिना अर्जुन भल्लासोबत साखरपुडा झाला होता. आता दोघेही त्यांच्या आयुष्याच्या नव्या टप्प्याला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनचा शाही सोहळा हा तीन दिवस चालणार आहे.

  • FIRST PUBLISHED :