हिंदी सिनेसृष्टी गाजवलेल्या मराठमोळ्या अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर नेहमीच आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.
आजही असंच काहीसं झालं आहे. प्रतीक पुन्हा एकदा आपल्या लव्हलाईफमुळे चर्चेत आला आहे. हा अभिनेता पुन्हा प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे.
पिंकव्हीलाच्या रिपोर्टनुसार, पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेता प्रतीक बब्बर सध्या एका अभिनेत्रीला डेट करत आहे.
ही अभिनेत्री इतर कुणी नसून 'बार बार देखो' फेम प्रिया बॅनर्जी असल्याचा खुलासा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
प्रतीक आणि प्रिया यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. दोघे एका वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. शिवाय ते सतत बाहेर फिरायलाही एकत्र जातात.
याआधी 2019 मध्ये प्रतीक बब्बरने सान्या सागरसोबत लग्नगाठ बांधली होती.परंतु अवघ्या एका वर्षातच हे दोघे विभक्त झाले. विशेष म्हणजे प्रतीक आणि सान्या लग्नाआधी बरेच वर्ष एकमेकांना डेट करत होते.
त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेता प्रेमात पडल्याचं समोर आल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु या दोघांनी आपल्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय.
कामाबाबत सांगायचं तर प्रतीक लवकरच तापसी पन्नू आणि प्रतीक गांधीसोबत 'वो लडकी है कहाँ ' या चित्रपटात झळकणार आहे.