बॉलिवूड सिंगर सुनिधी चौहान सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. सुनिधी आणि तिचा पती हितेश सोनिक यांनी लग्नाच्या 8 वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळं होणाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. (फोटो- सुनिधी चौहान इन्स्टाग्राम)
स्पॉटबॉय-ईनं दिलेल्या वृत्तानुसार सुनिधी आणि हितेश मागच्या काही दिवसांपासून वेगळे राहत आहेत. मात्र त्यांनी ही गोष्ट कधीच लोकांसमोर येऊ दिली नाही. तसेच मीडियासमोरही या बद्दल काही बोलण्यास तिनं नकार दिला होता. (फोटो- सुनिधी चौहान इन्स्टाग्राम)
लॉकडाऊनपूर्वी सुनिधी, हितेश आणि त्यांचे काही मित्र गोवा ट्रिपवर गेले होते. मात्र तिथून परतल्यावर त्यांचं नातं आणखीच बिघडल्याचं समोर आलं अशी माहिती तिच्या जवळच्या सूत्रांनी दिली. (फोटो- सुनिधी चौहान इन्स्टाग्राम)
मात्र सुनिधीच्या पतीनं मात्र त्यांच्या वेगळं होण्याचं वृत्त फेटाळलं आहे. आम्ही अद्याप एकाच घरात राहत आहोत आणि सध्या लॉकडाऊनमध्ये आम्ही घरातली काम सुद्धा वाटून घेतली आहेत असं त्यानं सांगितलं. (फोटो- सुनिधी चौहान इन्स्टाग्राम)
सुनिधी आणि हितेश यांच्या लग्नाला आठ वर्षं झाली आहे. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनीही 2012 मध्ये गोव्यात ग्रँड रिसेप्शनसह लग्न केलं होतं. (फोटो- सुनिधी चौहान इन्स्टाग्राम)
लग्नानंतर 5 वर्षांनी जानेवारी 2018 मध्ये सुनिधीनं मुलाला जन्म दिला. ती नेहमीच मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो- सुनिधी चौहान इन्स्टाग्राम)
सुनिधी चौहानचं हे दुसरं लग्न आहे. तिनं याआधी 2002 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी कोरिओग्राफर बॉबी खानसोबत लग्न केलं होतं. मात्र अवघ्या एका वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला. (फोटो- सुनिधी चौहान इन्स्टाग्राम) (संकलन- मेघा जेठे.)