NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / आईसोबत शेवटचं दिसला होता Sidharth Shukla, एअरपोर्टवरील हे Photos होतायंत व्हायरल

आईसोबत शेवटचं दिसला होता Sidharth Shukla, एअरपोर्टवरील हे Photos होतायंत व्हायरल

Sidharth Shukla Death: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण मनोरंजन विश्व हादरून गेलं आहे.

17

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. (फोटो सौजन्य-Manav Manglani)

27

सिद्धार्थ त्याच्या बालिका वधू या मालिकेसाठी विशेष प्रसिद्ध होता. त्यानंतर बिग बॉसचा 13वा सीझन जिंकून त्याने कमालीची प्रसिद्धी मिळवली. Alt बालाजीवरील ब्रोकन बट ब्यूटिफूल ही त्याची सीरिज देखील विशेष गाजली (फोटो सौजन्य-Manav Manglani)

37

कूपर रुग्णालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थचा हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वी मृत्यू झाला होता. (फोटो सौजन्य- Manav Manglani)

47

मीडिया अहवालांनुसार, हॉस्पिटलच्या सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की रात्री झोपण्यापूर्वी अभिनेत्याने काही गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. (फोटो सौजन्य- Manav Manglani)

57

सिद्धार्थ शुक्लाच्या पश्चात त्याची आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान सिद्धार्थचे काही एअरपोर्टवरील फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी व्हायरल झालेले सिद्धार्थचे हे शेवटचे फोटो आहेत. एअरपोर्टवर आई रिटा शुक्ला यांच्यासह सिद्धार्थ दिसला होता. (फोटो सौजन्य- Manav Manglani)

67

मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थचा मृतदेह (Sidharth Shukla Died) कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आता हे सांगणं कठीण आहे की त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल आणि पोस्ट मार्टम अहवालानंतर त्याचप्रमाणे सिद्धार्थसह राहणाऱ्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतर यावर स्पष्ट काही सांगता येईल. (फोटो सौजन्य-Manav Manglani)

77

मेडिकल अहवाल आणि पोस्ट मॉर्टम अहवाल समोर येईल आणि त्याचप्रमाणे त्याच्यासह राहणाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र त्याच्या शरिरावर कोणतीह बाह्य जखम नाही आहे. सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य-Manav Manglani)

  • FIRST PUBLISHED :