बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधत चाहत्यांना खुश केलं आहे.
दरम्यान या दोघांच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसून येत आहेत.
अशातच आता सिड-कियाराने आपल्या लग्नातील काही अनसीन फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
या फोटोमध्ये हे सुंदर सेलिब्रेटी जोडपं एकमेकांसोबत नाचताना दिसून येत आहेत.
हे फोटो कियारा आणि सिद्धार्थच्या संगीत सोहळ्यातील असल्याचा अंदाज लावला जात आहे.
या सोहळ्यातही सेलिब्रेटी जोडप्याने अगदी रॉयल लूक कॅरी केला आहे.
सिद्धार्थ-कियाराचे हे नवे फोटो समोर येताच व्हायरल झाले आहेत.
सेलिब्रेटी आणि चाहते या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.