बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती.
काल अखेर सिद्धार्थ आणि कियारा लग्न बंधनात अडकले आहेत.
सोशल मीडियावरुन या नव दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्ट याबाबत काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.
सिड-कियाराच्या लग्नानंतर अखेर आलियाने प्रतिक्रिया दिली आहे.
आलिया भट्टने सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या फोटो शेअर करत, तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा असं म्हटलं आहे.
आलिया आणि सिद्धार्थने 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनंतर दोघेही एकेमकांच्या प्रेमात पडले होते.परंतु काही काळाने दोघांचा ब्रेकअप झाला होता.
त्यांनतर आलियाने रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली आहे.