बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या लग्नामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहेत.
कियारा-सिद्धार्थने ७ फेब्रुवारीला कुटुंबीय आणि खास लोकांच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली आहे.
या सेलिब्रेटी कपलने लग्नानंतर सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले होते.
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड पसंत केले जात आहेत. शिवाय हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहेत.
विशेष म्हणजे सिद्धार्थ-कियाराच्या फोटोंनी नवा विक्रम स्थापित केला आहे.
सिद्धार्थ कियाराच्या वेडिंग फोटोला इन्स्टाग्रामवर तब्बल २३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
यापूर्वी कतरिना-विकीच्या वेडिंग फोटोला २०. ४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते.
तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या फोटोला १३ मिलियन व्ह्युव्ह मिळाले होते.
दीपिका आणि रणबीरच्या फोटोला १०. ७ मिलियन व्ह्युव्ह मिळाले होते.
अनुष्का आणि विराटच्या फोटोला ७.८ मिलियन व्ह्युव्ह मिळाले होते.