श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' मध्ये झळकणार आहे.
दरम्यान पलक तिवारी आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
या दोघांना अनेकवेळा एकत्र पार्टी करताना आणि बाहेर फिरताना पाहण्यात आलं आहे.
आता स्वतः पलक तिवारीने एका मुलाखतीदरम्यान आपल्या आणि इब्राहिमच्या नात्याबाबत खुलासा केला आहे.
इब्राहिम सोबतच्या नात्यावर बोलताना पलक म्हणाली की, मी आणि इब्राहीम एक कपल आहे यात तथ्य नाहीय.
आम्ही दोघेही फक्त मित्रांसोबत एकत्र भेटतो. दोघे एकटे कधीही नाही भेटत. किंवा दररोज चॅटिंगसुद्धा नाही करत. शिवाय त्याला मी सलमान खानसोबत सध्या चित्रपट करत आहे याबाबतही माहिती नाही.
इब्राहिम एक खूप टॅलेंटेड मुलगा आहे. एक मोठा स्टार होण्यासाठी असलेले सर्व गुण त्याच्यात आहेत.