भारत-न्यूझीलंड दरम्यान झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात युवा क्रिकेटर शुभमन गिलने द्विशतक झळकावत धमाका केला आहे.
सध्या सर्वत्र शुभमन गिलवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. सोशल मीडियावर शुभमनची हवा दिसून येत आहे.
चाहते विविध पोस्ट आणि कमेंट्स करत शुभमनवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान शुभमन गिल आणि ज्युनिअर एनटीआरची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
चाहते आता चक्क जुनिअर एनटीआरच्या त्या कमेंट्सचा संदर्भ शुभमन गिलच्या द्विशतकासोबत जोडत आहेत.
सामन्याच्या काही दिवस आधी शुभमनने ज्युनिअर एनटीआरसोबतचा एक फोटो शेअर करत त्याच्या आरआरआर गोल्डन ग्लोब मिळाल्याबद्दल त्याचं आणि त्याच्या टीमचं अभिनंदन केलं होतं.
त्यांनतर या पोस्टवर कमेंट करत ज्युनिअर एनटीआरने शुभमनचे आभार मानत त्याला भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
आता शुभमनने या सामन्यात द्विशतक झळकवल्यानंतर चाहते ज्युनिअर एनटीआर त्याच्यासाठी लकी असल्याचं म्हणत आहेत.