बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सुंदर, ग्लॅमरस, बोल्ड फोटो शेअर करत असतात.
मात्र नुकतंच अभिनेत्री श्रृती हससने तिच्या इन्स्टाग्रामवर काही विना-मेकअपवाले फोटो शेअर केले आहेत.
श्रृतीने इन्स्टाला पाच वेगवेगळ्या मूड आणि परिस्थितील फोटो शेअर केले आहेत.
पहिल्या फोटो श्रृतीने मोकळे केस सोडून सेल्फी काढली आहे.
दुसऱ्या फोटोत ती काहीशी थकलेली दिसत आहे.
तिसऱ्या फोटोमध्ये श्रृतीचं तोंड सुजलेलं दिसत आहे.
चौथ्या फोटोमध्ये ती आजारी दिसतेय. पाचव्या फोटोमध्ये श्रृती मस्त आनंदी पहायला मिळतेय.
फोटो शेअर करत श्रृती म्हणाली, परफेक्ट पोझ आणि सेल्फीच्या जगात हे असे काही फोटो आहेत ज्यामध्ये 'बॅड हेअर डे, आजारपण, सूजलेला चेहरा पीरिअड क्रॅंप', असणारे फोटो आहेत.