अभिनेत्री श्रीया पिळगांवरकर सोशल मीडियावर विशेष सक्रीय असते. ती तिच्या लेटेस्ट प्रोजेक्ट्सच्या माहितीसह विविध फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करते. दरम्यान या गुलाबी सूट मधील तिचा लुक एकदम बॉसी वाटत आहे
'मिर्झापूर'मध्ये तिने साकारलेल्या स्विटी गुप्ताचा लुक अगदी साधासरळ दाखवण्यात आला होता. त्यानंतर तिने अनेक ग्लॅमरस भूमिकाही केल्या. याशिवाय तिने पोस्ट केलेले तिचे ट्रेंडी फोटोशूटही व्हायरल होत असतात.
सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर या दिग्गज कलाकारांची 'एकुलती एक' लेक असणाऱ्या श्रीयाने तिचीही वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध भाषांमध्ये तिने काम करुन ही ओळख तयार केली आहे.
तिने ज्याप्रमाणे करिअरमध्ये विविध भूमिका आत्मविश्वासाने केल्या त्याप्रमाणे हा लुक देखील आत्मविश्वासपूर्ण आहे.
श्रीयाने या लेटेस्ट फोटोशूटमध्ये गुलाबी रंगाचा पँटसूट परिधान केला असून त्यावर साजेसा पण थोडकाच मेकअप केला आहे. शिवाय त्यावर तिने लाल रंगाच्या इअररिंग्ज परिधान केले आहेत
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या गिल्टी माइंड्स या वेबसीरिजच्या प्रमोशनवेळी करण्यात आलेले हे फोटोशूट आहे. 22 एप्रिल रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार आहे
या वेबसीरिजची सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चा आहे. यामध्ये अभिनेत्री श्रीया अभिनेता वरुण मित्रासह मूख्य भूमिकेत दिसणार आहे.
श्रीया पिळगावकर हिने 'हाथी मेरे साथी', 'हाऊस अरेस्ट', 'मिर्झापूर', 'क्रॅकडाऊन', 'एकुलती एक', 'द गॉन गेम' यांसारख्या मुव्हीज-वेबसीरिजमध्ये भूमिका केली आहे. तिने फॅन या सिनेमात अभिनेता शाहरुख खानसह देखील स्क्रीन शेअर केली आहे.