मराठी-हिंदी सिनेमातील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आपल्या एका ट्विटमुळे प्रचंड चर्चेत आला आहे.
या ट्विटमधून श्रेयस तळपदेने बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननची माफी मागितली आहे.
अभिनेत्याने नेमकं क्रितीची माफी का मागितली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर आपण या ट्विटबाबतच जाणून घेणार आहोत.
काही वेळेपूर्वी श्रेयस तळपदेच्या ट्विटर अकाउंटवरुन एक ट्विट शेअर करण्यात आला होता.
यामध्ये क्रिती सेननला टॅग करत लिहलं होतं, 'मी नुकतंच शेहजादा पाहिला.. क्रिती तूच देशाची पुढची मधुबाला आहेस'.
यावर क्रितीने उत्तर देत, ' ही खूप मोठी गोष्ट असून, तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद म्हटलं होत.
परंतु क्रितीबाबत केलेला तो ट्विट श्रेयसने केलाच नव्हता, खरं तर त्याच्या फेक अकाउंटवरुन कोणीतरी हा ट्विट केला होता.
आणि क्रितीनेसुद्धा अकाउंट अधिकृत आहे की नाही तपासून न पाहता त्यावर उत्तर दिलं होतं.
त्यामुळेच श्रेयसने ट्विट करत, क्रितीची माफी मागत, तिला तिच्या सिनेमासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.