सगळीकडे दिवाळी जोरदार पद्धतीनं साजरी केली जात आहे. अशातच कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेनंही तिच्या घरचे लश्र्मीपुजनाचे फोटो शेअर केले आहेत.
श्रेयानं फॅमिलीसोबतचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
श्रेयानं फोटो शेअर करताच काही क्षणात हे फोटो व्हायरल झालेले पहायला मिळाले.
फोटोमध्ये श्रेयानं लाल रंगाची साडी घातलेली दिसत आहे. तिच्या या लुकवर चाहते खूप साऱ्या प्रतिक्रिया देत आहेत.
आपल्या विनोदी शैलीनं सगळ्यांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. श्रेया झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असते.
श्रेया तिच्या हटके विनोदी शैलीने कायमच प्रेक्षकांना हसवत आली आहे. अशातच अनेकांच्या ओठांवर हसू उमटवणारी अभिनेत्री, कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे तिच्या दिवाळी स्पेशल फोटोंनी सध्या चर्चेत आली आहे.
श्रेयानं चला हवा येऊ द्या कार्यक्रमामध्ये येण्यापूर्वी मालिकेत आणि वेबसिरीजमध्येही काम केलं आहे.
श्रेयाचा चाहता वर्गही आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तिचे फोटो, व्हिडीओ अगदी काही क्षणातच व्हायरल होतात.