बॉलिवूडची सर्वात लाडकी स्टारकिड म्हणून श्रद्धा कपूरला ओळखलं जातं. अभिनेते शक्ती कपूर यांची लेक असूनही श्रद्धा कपूरने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या श्रद्धाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये अभिनेत्री चक्क पाणीपुरी आणि रगडा पॅटिसचा मनमुराद आस्वाद घेताना दिसून येत आहे.
श्रद्धा आपला भाऊ सिद्धांत कपूर आणि इतर भावंडासोबत घरीच मजामस्ती करतांना दिसत आहे.
श्रद्धा कपूरने फोटो शेअर करत पाणीपुरी अभिनेत्री आणि श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे यांनी बनवल्याचं म्हटलं आहे.
तर रगडा पॅटिस तेजस्विनी कोल्हापुरेने बनवल्याचं म्हटलं आहे.
श्रद्धा कपूर प्रचंड फुडी आहे. ती सतत वेगवगेळ्या पदार्थांचा आस्वाद घेत असते.
श्रद्धा कपूर लवकरच अभिनेता रणबीर कपूरसोबत 'तू झुटी मै मक्कार' मध्ये दिसणार आहे.