रोहित शेट्टी होस्ट करत असलेला 'खतरों के खिलाडी' हा शो छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शोपैकी एक आहे.
या शोमुळे अनेक कलाकारांचं नशीब उघडलं आहे. अनेकांना तुफान लोकप्रियता मिळाली आहे.
दरम्यान 'खतरों के खिलाडी'च्या आगामी सीजनमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
अशातच 'बिग बॉस 16'चा लोकप्रिय स्पर्धक शिव ठाकरे या सिजनमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
तसेच शिव ठाकरे या सीजनचा सर्वात महागडा स्पर्धक असल्याचं म्हटलं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरेला शो मेकर्सनी शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. त्याला एका एपिसोडसाठी 5 ते 6 लाखची ऑफर मिळाली आहे.
शिव ठाकरेने बिग बॉसच्या घरातच आपल्याला हा शो करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली होती. तसेच शिवने अँजन या शोमध्ये सहभागी होत असल्याचंही कन्फर्म केलं आहे.