NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / शाहरुखसाठी 3 तास हवेत लटकत राहिली शिल्पा, कारण वाचून कराल कौतुक

शाहरुखसाठी 3 तास हवेत लटकत राहिली शिल्पा, कारण वाचून कराल कौतुक

1993मध्ये रिलीज झालेल्या 'बाजीगर' सिनेमात शिल्पा शेट्टीनं शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली होती.

17

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीला फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाते. स्वतःला फिट ठेवणारी शिल्पा सिनेमाच्या एखाद्या कठीण सीनसाठीही खूप मेहनत घेते.

27

1993मध्ये रिलीज झालेल्या 'बाजीगर'मधील सीमा चोप्रा कोणाला लक्षात राहणार नाही. या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शिल्पाला सीमाची भूमिका साकारण्यासाठी खूप घाम गाळावा लागला होता.

37

काही दिवसांपूर्वी शिल्पानं एका टीव्ही शोमध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. यावेळी अब्बास-मस्तान यांचा एक व्हिडिओ प्ले करण्यात आला. या व्हिडिओमध्ये अब्बास-मस्तान बाजीगरमधील शिल्पाच्या स्टंट सीनबद्दल सांगताना दिसले.

47

अब्बास-मस्तान सांगतात, बाजीगरसाठी शिल्पानं खूप मेहनत घेतली होती. या सिनेमात तिनं एक रिअल सीन शूट केला होता. शाहरुख खान शिल्पाला घराच्या छतावरून धक्का देतो आणि ती खाली पडते. असा तो सीन होता.

57

हा सीन शूट करण्यासाठी अब्बास मस्तान यांनी सुरुवातीला ग्राफिक्स वापरण्याचा विचार केला होता. पण नंतर तो सीन रिअल शूट करावा असं ठरलं. शिल्पाला हार्निस आणि केबलच्या मदतीने हवेत लटकवण्यात आलं.

67

हा सर्वात कठीण सीन होता. शिल्पानं यासाठी पूर्ण मेहनत घेतली. तब्बल 3 तास ती हवेत लटकून होती. यावेळी तिनं खाणं पिणंही हवेत लटकूनच केलं. ती स्वतःच्या हातानं खाऊ शकत नव्हती तिला भरवावं लागत होतं पण तिने हार न मानता हा सीन पूर्ण केला.

77

सीन शूट झाल्यानंतर शिल्पाच्या शरीरावर अनेक ठीकाणी जखमा झाल्या होत्या. शिल्पाच्या करिअरमधील हा पहिला सिनेमा होता आणि या सिनेमाला अनेक अवॉर्डही मिळाले होते.

  • FIRST PUBLISHED :