बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेससाठी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. अभिनेत्री एक्सरसाईजपासून आपल्या जेवणापर्यंत सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष देत असते.
शिल्पा शेट्टीचा फिटनेस पाहून फक्त मुलेच नव्हे तर मुलीसुद्धा घायाळ होतात.
अनेक मुली शिल्पा शेट्टीला स्टाईल आयकॉन मानतात. स्टिच आपली फिटनेस इन्स्पिरेशन समजतात. अनेक लोक अभिनेत्रीचा फिटनेस प्लॅन फॉलो करतात.
शिल्पा शेट्टीच्या फॉलोअर्ससाठी आज एक खास माहिती आहे. अभिनेत्रीने आपल्या लंचचा फोटो शेअर करत महत्वाचा संदेश दिला आहे.
शिल्पा शेट्टीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
हा फोटो अभिनेत्रींच्या जेवणाच्या ताटाचा आहे. यावरुन अभिनेत्री लंचमध्ये काय-काय खाते याचा अंदाजा येत आहे.
शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या ताटात छोले, गाजर,फ्लॉवर यांची मिक्स भाजी, तसेच शिमला मिरची आणि पनीरची मिक्स भाजी, सॅलडमध्ये बिट आणि कांद्याचे काप, सोबतच एक मिक्स पिठाची भाकरी दिसून येत आहे.
शिल्पा शेट्टीचा हा आहार अतिशय साधा परंतु तितकाच सकस-पौष्टिक आहे. त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
अभिनेत्रीने फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'मला दीपक चोप्रा यांनी दिलेला हा कोट खूप आवडतो आणि मी त्याप्रमाणेच जगते. तुमचं ताट इंद्रधनुष्याच्या रंगानी भरा. काय डोळ्यांना सुखावतं, आणि काय शरीराला सुखावतं'.
'अभिनेत्रीने पुढं लिहिलंय, 'मन, शरीर आणि आत्म्याला पोषक आहार देणार्या आरोग्यदायी जेवणासाठी आम्ही खूप कृतज्ञ आहोत'.