'बिग बॉस'मुळे अभिनेता शालिन भनौत प्रचंड लोकप्रिय झाला होता. दरम्यान त्याची एक्स पत्नी-अभिनेत्री दलजित कौरसुद्धा चर्चेत आली होती. दरम्यान कौर आपल्या दुसऱ्या लग्नामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
पापाराझींसोबत बोलताना दलजित कौरने आपल्या लग्नाबाबत आणि सुरु असलेल्या सर्व कार्यक्रमांबाबत अपडेट दिली आहे. अभिनेत्रीने म्हटलं, वेळ फारच लवकर निघून जात आहे. लग्नाचा दिवस आता आहे. मी थोडीशी नर्व्हस होत आहे.
अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, देशात आणि विदेशात असलेले त्यांचे सर्व मित्र पाहुणे या लग्नात सहभागी होणार आहेत. आता जवळजवळ घरात खूप एका-एका खोलात सात-आठ लोक राहात आहेत.
अभिनेत्रीने असंही सांगितलं कि, शालिन माझ्या लग्नामुळे खूप खुश आहे. आमच्यातील नाती आता ठीक आहेत. त्यानेसुद्धा आयुष्यात पुढे जाऊन आनंदी राहिलं पाहिजे.
दलजित म्हणाली, मी गेल्या २० वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. मी हे काम कधीच सोडणार नाही. मात्र आता मला तीन मुले आहेत. त्यांच्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद हवेत.
अभिनेत्रीने सांगितलं की, १६ तारखेपासून लग्नाचे कार्यक्रम सुरु होतील. तीन दिवस चालतील यामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबीय असणार आहेत. आणि १८ तारखेला आम्ही लग्नगाठ बांधणार असल्याचं आहे.
होणाऱ्या पतीबद्दल सांगताना दलजित म्हणाली, निखिल अजूनही कामात आहे, तो दररोज करुन काय-काय झालं काय सुरु आहे याची चौकशी करतो. माझ्याकडून उत्तर नाही मिळालं तर माझ्या आई आणि बहिणीला फोन करुन माहिती करुन घेतो.