शाहरुख खानची लेक सुहाना खानने अजूनही बॉलिवूड पदार्पण केलेलं नाहीय. परंतु तरी तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तिचे लाखो चाहते आहेत. चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असते.
तिचे फोटो आणि व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होत असतात. नुकतंच सुहानाचे नवे फोटो समोर आले आहेत. मंगळवारी संध्याकाळी ती 'मन्नत' या बंगल्याबाहेर स्पॉट झाली.
सुहाना खान तिच्या कारमधून कुठेतरी जात होती. यावेळी तिचा 'मिस्ट्री' फ्रेंडसुद्धा सोबत कारमध्ये दिसला.
सुहाना खान कारमध्ये होती तेव्हा पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. महत्वाचं म्हणजे पापाराझीला पाहून सुहाना आणि तिच्या मिस्ट्री फ्रेंडने तोंड लपवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सुहाना खानने शेवाळी रंगाचा चेक्सचा शर्ट घातला दिसत होता. तर त्याचा त्याचा मित्र फुल स्लीव्ह स्वेटशर्टमध्ये दिसून आला.
सुहाना खानचा हा मिस्ट्री फ्रेंड कोण आहे? याबद्दल कुणालाच माहिती नाही. सुहाना न्यूयॉर्कमध्ये शिकत होती आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करुन ती भारतात परतली आहे.
सुहाना खान जोया अख्तरच्या लोकप्रिय कॉमिक 'आर्ची'च्या हिंदी व्हर्जनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सुहाना खान अनेकदा तिच्या बालपणीच्या मैत्रिणी अनन्या पांडे आणि शनाया कपूरसोबत हँग आउट करताना दिसते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बॉलीवूड स्टार किड्सनी एकमेकांसोबत वेळ घालवला होता.