बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलीला आपल्या कॉलेज डेजची आठवण येत असल्याचं दिसत आहे.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
सुहाना खानने आपले हे खास फोटो शेअर करत 'थ्रोबॅक टू माय कॉलेज डेज' असं म्हटलं आहे.
सध्या अनेक स्टार किड्स प्रचंड चर्चेत आहे. यापैकी सुहाना खान ही सर्वात पहिला येते.
सुहाना खानने अजूनही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. तत्पूर्वीच तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्री इतकी आहे.
आपला ग्लॅमरस लुक आणि फ्रेंड सर्कलमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते.
सुहाना सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय आहे. ती सतत आपले फोटो शेअर करत असते. बऱ्याचवेळा ती आपल्या परदेशी मित्रांसोबत मजामस्ती करताना दिसू येते.
सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत होती. नुकताच तिचं न्यूयॉर्कमधील शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतली आहे.