बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
मनोरंजनसृष्टीपासून दूर असूनही मीरा एखाद्या अभिनेत्री इतकीच लोकप्रिय आहे.
मीरा फॅशन, स्टाईल आणि फिटनेसच्या बाबतीत करीना कपूरलासुद्धा टक्कर देते.
मीरा सतत सोशल मीडियावर आपले नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
नुकतंच मीरा स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.
त्यावेळी मीराने जो अनारकली ड्रेस परिधान केला होता. त्याची किंमत ऐकून सर्वच थक्क झाले आहेत.
मीरा राजपूतने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत 74 हजार 800 इतकी असल्याचं सेलिब्रेटी फॅशन डिकोडच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
मीरा सतत असे विविध महागडे पोशाख परिधान करत असते.