सायली संजीव ही मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर आणि गोंडस अभिनेत्री आहे.
सायलीचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
दरम्यान सायली संजीव राजकारणात एन्ट्री करणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
नुकतंच सायलीने एका मुलाखतीत आपल्याला भविष्यात संधी मिळाली तर निवडणूक लढवणार असं म्हटलं होतं.
तसेच आपण ज्या पक्षात आहोत त्याचेच विचार आपण मांडणार एखाद्या इतर व्यक्तीचे योग्य विचार पटले तर त्याचं कौतुकही करणार पण पक्षाचे विचार सोडून नाही चालणार असंही ती म्हणाली होती.
दरम्यान आता सायली संजीव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
सायलीने शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
सायलीने म्हटलंय, ;सुषमाताई तुम्ही जे काही बोलता ते मला फार आवडतं.
तुमचे खूप आभार, मला हे याआधीच बोलायचं होतं पण ते राहून गेलं'असं म्हणत सायलीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. या कार्यक्रमात सुषमा अंधारेसुद्धा उपस्थित होत्या.
सायलीच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.