नुकतंच मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं आहे.
सतीश यांच्या अचानक निधनाने मनोरंजन सृष्टीसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांचे अनेक किस्से आणि त्यांच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी आता व्हायरल होत आहेत
फारच कमी लोकांना माहिती असेल की, सतीश कौशिक यांचं अभिनेत्री नीना गुप्तांवर प्रचंड प्रेम होतं.
नीना गुप्ता यांनी आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये या गोष्टीचा खुलासा करत सांगितलं होतं.
त्यांनी म्हटलं होतं, 'त्या लग्नाआधीच जेव्हा गरोदर होत्या, तेव्हा सतीश यांनी त्यांना प्रपोज केलं होतं.
नीना लग्न न करता गरोदर असतानाही सतीश त्यांच्याशी लग्न करायला तयार होते.
इतकंच नव्हे तर त्यांचं आपत्य कृष्णवर्णीय असेल तर त्यांनी ते मुल आपलं असल्याचं सगळ्यांना सांगावं आणि आपल्याशी लग्न करावं म्हणजे कोणालाही काहीही समजणार नाही अशी त्यांची इच्छा होती.
परंतु नीनानी सतीश यांच्या प्रपोजलला नकार देत एकटी आपल्या मुलीचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला होता.