''साराभाई वर्सेस साराभाई 2' या शोमध्ये जस्मिनची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं मंगळवारी सकाळी निधन झालं आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती 32 वर्षांची होती.
वैभवी जस्मिनच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली होती. या भूमिकेने लोकांना भुरळ पाडली होती.
या विनोदी मालिकेत जस्मिन ही रोशेस अर्थातच अभिनेता राजेश कुमारची गर्लफ्रेंड असते.
यामध्ये रोशेस हा रत्ना पाठक यांचा मुलगा दाखवण्यात आला आहे.
रत्ना पाठक आणि वैभवी उपाध्याय यांच्यात सतत मजेशीर नोकझोक दाखवण्यात येत असे.
या दोघींच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. वैभवीच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.