सैफ अली खान आणि अमृता सिंगची लेक सारा अली खानने बॉलिवूडमध्ये आपला चांगला जम बसवला आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
सारा अली खान पडद्यावरच नव्हे तर सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते.
नुकतंच साराने आपल्या समर व्हेकेशनचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये सारा स्विमिंग पूलमध्ये काही निवांत क्षण घालवताना दिसून येत आहे.
परंतु या फोटोमध्ये सारासोबत स्विमिंग पूलमध्ये एक मुलगासुद्धा दिसून येत आहे. सारासोबत गप्पा मारणार हा मिस्ट्री मॅन कोण? अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
विशेष म्हणजे या ट्रीपमध्ये सारा अली खानसोबत आई अमृतासुद्धा आहे.
सारा अली खानसोबत असणारा मुलगा साराचा मित्र आहे नातेवाईक आहे की तिचा नवा बॉयफ्रेंड आहे? अशा विविध चर्चा आता रंगल्या आहेत.