पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कंपनीच्या गाडीतून प्रवास करतात, आता अभिनेता संजय दत्तनेही तीच कार खरेदी केली आहे. यामध्ये थोडा फरक आहे. संजय दत्तने नुकतीच मर्सिडीज मेबॅक S580 खरेदी केली आहे. तर पंतप्रधान मोदी मर्सिडीज मेबॅकच्या त्याच S650 गार्ड एडिशनमध्ये प्रवास करतात. संजय दत्तला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. पाहूया या कारमध्ये काय आहे खास.
मर्सिडीज मेबॅक S580 मध्ये v8 इंजिन आहे. जे 4.0L इंजिन आहे. हे टर्बोचार्ज केलेलं पेट्रोल इंजिन आहे. हे 9 गीअर्ससह सुसज्ज ऑटो ट्रान्समिशन आहे. ते 5.5 मीटर सेडान प्रकारात मोडते. संजय अलीकडेच त्याच्या नवीन कारसह एयरपोर्टवर दिसून आला.
मर्सिडीजचे मेबॅकचं हे मॉडेल हौशी आणि व्हीव्हीआयपी लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे. इतर कारमध्ये येणारी किरकोळ वैशिष्ट्ये या वाहनात बरीच प्रगत आहेत. लक्झरीबद्दल बोलायचं झालं तर, याच्या मागील सीट 19 अंशांपासून 45 अंशांपर्यंत खाली येऊ शकतात. यासोबतच यामध्ये लेग रेस्टही देण्यात आली आहे.
मर्सिडीजचं मेबॅक मॉडेल जगातील निवडक लोकांच्या संग्रहात ठेवण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे तिची गणना सर्वात सुरक्षित कारमध्ये केली जाते.
10 एअरबॅगसह सुसज्ज हे वाहन पुढील आणि बाजूच्या बीम्सने सुसज्ज आहे. तसेच, त्याची अंडरबॉडी प्रोटेक्शन कोणत्याही परिस्थितीत वाहनाच्या चेंबर किंवा इंधन टाकीचं नुकसान टाळते.
ही कार फक्त 4.8 सेकंदात 0-100 चा वेग पकडू शकते आणि जेव्हा त्याचा टॉप स्पीड येतो तेव्हा ते 250 किमी/ताशी पोहोचू शकते. परंतु स्पीड गव्हर्नन्समुळे भारतीय मॉडेलमध्ये टॉप स्पीड थोडा कमी आहे.
मेबॅक व्यतिरिक्त, संजय दत्तच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर, रोड राईज, लेक्सस, ऑडी, मर्सिडीज, फेरारी अशा महागड्या कारचे सुधारित मॉडेल्स आहेत. तसेच टोयोटा लँड क्रूझरसोबतच हार्ले डेव्हिडसनची फॅट बॉब आणि डुकाटी मोटरसायकल देखील आहे.