लॉकडाउनमुळं वजन आणि नैराश्य वाढतंय अशी तक्रार गेल्या वर्षभरात अनेकांनी केली. अर्थात ही तक्रार काही अंशी योग्यच होती. परंतु काही सेलिब्रिटींनी मात्र लॉकडाउनचा वापर खूप चांगल्या प्रकारे केला.
त्यांनी आपल्या बेशिस्त आयुष्यात थोडीशी शिस्त आणली. परिणामी त्यांना आता आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवत आहेत. असाच काहीसा बदल श्वेता रोहिरा हिनं आपल्या आयुष्यात केला आहे.
सलमान खानच्या या मानलेल्या बहिणीनं लॉकडाउनच्या काळात तब्बल 40 किलो वजन कमी केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिनं थक्क करणारी माहिती दिली.
पुलकित सम्राटसोबत घटस्फोट झाल्यामुळं श्वेता नैराश्येत गेली होती. त्यानंतर तिचं वजन 82 किलो पर्यंत वाढलं. परिणामी तिला तिच्या वजनावरुन ट्रोल देखील केलं जायचं.
मात्र एक दिवस तिनं या नैराश्येतून बाहेर येणाचा निर्णय घेतला. आपल्या बेशिस्त आयुष्याला वळण देण्यास सुरुवात केली. दररोज व्यायाम आणि योग्य आहार घेण्यास सुरुवात केली.
दिड वर्षांच्या प्रदिर्घ मेहनतीमुळं तिचं 40 किलो वजन कमी झालं. आता तिचं वजन 42 किलो आहे.
जर तुम्हाला देखील वजन कमी करायचं असेल तर सकस आहार घ्या. भरपूर पाणी प्या. आणि दररोज व्यायाम करा असा सल्ला तिनं आपल्या चाहत्यांना दिला आहे.