NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Salman Khan: 'तू अनेकांचं करिअर खराब केलंस', आरोपांवर सलमान खानचं Shocking उत्तर

Salman Khan: 'तू अनेकांचं करिअर खराब केलंस', आरोपांवर सलमान खानचं Shocking उत्तर

Salman Khan Interview: बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांना सलमान खानची साथ मिळाली आणि त्यांचं करिअर यशस्वी झालं.त्याने अनेक कलाकारांची कारकीर्द घडवली असल्याचं बोललं जातं.

17

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांना सलमान खानची साथ मिळाली आणि त्यांचं करिअर यशस्वी झालं.त्याने अनेक कलाकारांची कारकीर्द घडवली असल्याचं बोललं जातं. तो नव्या-जुन्या अनेक अभिनेत्यांसाठी गॉड फादरचं सांगितलं जातं.

27

पण त्याबरोबरच अनेक कलाकारांचं करिअर सलमानने खराब केल्याचा आरोपही त्याच्यावर झाला आहे. या आरोपांवर भाईजानने उघडपणे आपलं मत मांडलं आहे.

37

एका मुलाखतीत आपल्यावर लागलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत सलमान खानने म्हटलं होतं की, त्याचा इंडस्ट्रीतील बहुतांश लोकांशी खाजगी संबंध नाही.

47

एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करत असतानाच आपण त्यांच्या संपर्कात येतो. शूटिंगदरम्यानच त्यांच्याशी बोलणं होतं. त्याव्यतिरिक्त अजिबात नाही.

57

सलमान खानने सांगितलं की, चित्रपटसृष्टीत त्याचे सर्व मित्र जास्तीत-जास्त त्याचे बालपणीचे सोबती आहेत किंवा ज्येष्ठ आहेत. त्याला सतत पार्टी करायला आवडत नाही. एखाद्या व्यक्तीसोबत अबोला धरुन सतत भांडत राहणं हा गुणही आपल्यात नसल्याचं त्याने म्हटलं होतं.

67

आपल्या मनातील भावना व्यक्त करताना सलमान खान म्हणतो, 'असे अनेक लोक आहेत जे दारु पिऊन इतरांना धडा शिकवण्याविषयी बोलतात. पण ड्रिंक केल्यानंतर मी 'अरे छोडो यार...' असं म्हणत विषय सोडून देतो. भाईजानकडूनही चूक होते आणि तोही ती मान्य करतो.

77

कामाबाबत सांगायचं झालं तर, सलमान खान आगामी काळात कतरिना कैफसोबत 'टायगर ३' मध्ये झळकणार आहे.

  • FIRST PUBLISHED :