बॉलिवूडचा दबंग खान अशी सलमानची ओळख आहे. सलमान मित्रांचा मित्र आणि वैरींचा कट्टर वैरी अशी त्याची बॉलिवूडमध्ये ओळख आहे. आज आम्ही तुम्हाला सलमानच्या ५ कट्टर वैरींबद्दल सांगणार आहोत.
संजय लीला भन्साळी- सलमानने भन्साळी यांच्या काही सिनेमात काम केलं आहे. मात्र काही काळाने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्यानंतर सलमानने भन्साळी यांच्या सिनेमांत काम करणं पूर्ण बंद केलं.
विवेक ओबेरॉय- सलमान आणि विवेकमधलं वैर तर साऱ्यांनाच माहीत आहे. असं म्हटलं जातं की सलमान आणि ऐश्वर्याचं नातं विवेकमुळे तुटलेलं. सलमानने विवेकसोबत मारपीटही केली होती. आजही दोघं एकमेकांशी बोलत नाहीत.
अर्जुन कपूर- सलमानची वहिनी मलायका अरोरासोबत अर्जुनच्या असलेल्या नात्यामुळे सलमानने अर्जुनला आपला वैरी केले. सलमानमुळेच अर्जुन बॉलिवूडमध्ये आला. मात्र आता दोघांमध्ये विस्तवही जात नाही.
सरोज खान- सरोज खान आणि सलमान खान यांचं वैर फार जूनं आहे अंदाज अपना अपना सिनेमाच्यावेळी कठीण डान्स स्टेप दिल्यामुळे सलमान आणि सरोज यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत कधीच काम केलं नाही.
अरिजित सिंग- सलमान आणि अरिजितमध्ये एका अवॉर्ड फंक्शनवेळी भांडण झाले. सलमानने अरिजितला ‘झोपलेला’ असं म्हटलं. याला अरिजितने प्रत्युत्तर दिले होते. यानंतर अरिजित आणि सलमानने कधीही एकत्र काम केलं नाही.