NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Actress Nagma: सलमानच्या अभिनेत्रीचं 5 विवाहित व्यक्तींशी होतं अफेयर;4 हिरो तर एक क्रिकेटर,तरीही राहिली एकटी

Actress Nagma: सलमानच्या अभिनेत्रीचं 5 विवाहित व्यक्तींशी होतं अफेयर;4 हिरो तर एक क्रिकेटर,तरीही राहिली एकटी

Nagma controvercial love affairs from sourav to sarathkumar ravi kishan-हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीत ९० च्या दशकात तरुणांना वेड लावणाऱ्या अशा काही सौंदर्यवती होत्या त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री नगमा होय. सध्या ती राजकारणात सक्रिय आहे. पण एकेकाळी तिचं नाव टॉलीवूड तसेच इतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आघाडीची नायिका म्हणून गाजलं होतं.

18

हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीत ९० च्या दशकात तरुणांना वेड लावणाऱ्या अशा काही सौंदर्यवती होत्या त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री नगमा होय. सध्या ती राजकारणात सक्रिय आहे. पण एकेकाळी तिचं नाव टॉलीवूड तसेच इतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आघाडीची नायिका म्हणून गाजलं होतं.नगमाने चिरंजीवी, बालकृष्ण, नागार्जुन, वेंकटेश आणि रजनीकांतपासून ते अमिताभ बच्चन, सलमान खान यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे. नगमाने चित्रपट आणि राजकारणात खूप नाव कमावलं आहे.

28

नगमाचा जन्म 1974 मध्ये मुस्लिम आणि हिंदू कुटुंबात झाला होता. तिची आई मुस्लिम होती आणि वडील जैसलमेरच्या राजघराण्यातील हिंदू कुटुंबातील होते. त्यानंतर नगमाचं कुटुंब गुजरात आणि मुंबईमध्ये वास्तव्यास होतं. नगमाने टॉलीवूड चित्रपटांव्यतिरिक्त हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

38

सलमान खानसोबत 'बागी: अ रिबेल फॉर लव्ह' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नगमाचं खाजगी आयुष्य अनेकवेळा वादात सापडलं आहे. तिला पडद्यावर खूप प्रेम मिळालं होतं आणि प्रत्येक अभिनेत्यासोबत तिची जोडी जमली होती. पण खऱ्या आयुष्यात नगम वयाच्या ४८ व्या वर्षीही एकटी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नगमाचं टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसोबत अफेयर होतं.क्रिकेटरने याचा अधिकृत उल्लेख कधी केला नसला तरी त्याकाळात याची प्रचंड चर्चा झाली होती.

48

दोघांनी तिरुपतीमध्ये गुपचूप लग्न केल्याच्याही बातम्या त्यावेळी समोर आल्या होत्या. मात्र, गांगुलीची पत्नी डोनाच्या आक्षेपानंतर या नात्यावर ब्रेक लागला होता. त्यावेळी गांगुलीने मैदानावर खराब कामगिरी केल्याने नगमाला लक्ष्य करण्यात आलं होतं. आणि चाहत्यांनी तिच्यावर गंभीर आरोपही केले होते.

58

सौरव गांगुलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नगमाचं राधिकाचे पती सरथ कुमारसोबत अफेअर होतं. राधिका ही सरथ कुमारची दुसरी पत्नी असल्याची माहिती आहे. मात्र, जेव्हा सरथ कुमारच्या पहिल्या पत्नीला नगमच्या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा तिने सरथला घटस्फोट दिला. मात्र, नंतर नगमानेही सरथ कुमारशी संबंध तोडले होते. दक्षिण आणि हिंदी चित्रपटांमध्ये फारशी संधी न मिळाल्याने नगमाने भोजपुरी चित्रपटांवर लक्ष केंद्रित केलं होतं. तेथे तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आणि त्या इंडस्ट्रीतही तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

68

नगमाने भोजपुरीचे सुपरस्टार रवी किशनसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिथल्या चाहत्यांनाही दोघांची केमिस्ट्री फार आवडते. त्यामुळे या दोघांच्या रोमान्सची भोजपुरी मीडियावर जोरदार चर्चा होत असे. रवी किशनने स्वतः नगमासोबतचं नातं मान्य केलं होतं. पण त्याचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम होतं. त्यामुळे तो नगमाशी लग्न करु शकला नाही.

78

या अभिनेत्याने एका मुलाखतीत नगमासोबतच्या नात्याबद्दलही सांगितलं होतं. तो म्हणाला की, त्याच्या आणि नगमाच्या नात्याबद्दल घरातील सगळ्यांना माहिती आहे. त्याची पत्नी प्रीतीही नगमाला आपली चांगली मैत्रीण समजत होती. मात्र, त्यांच्या अफेयरची माहिती मिळताच पत्नी प्रीतीचं रवी किशनसोबत भांडण झालं होतं. आणि त्यातूनच रवी किशनचे नगमासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता.

88

रवी किशनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नगमाचं नाव भोजपुरी अभिनेता मनोज तिवारीसोबत जोडलं गेलं होतं. त्यावेळी इंडस्ट्रीत मनोज आणि रवी किशन यांच्यात मोठं वैर होतं. मात्र, मनोज आणि नगमा या दोघांनीही त्यांच्या अफेअरच्या बातम्यांचं जाहीरपणे खंडन केलं होतं. याबद्दल बोलताना अभिनेत्री एकदा म्हणाली होती, 'फक्त आम्ही एकत्र काम करत आहोत, याचा अर्थ असा नाही की आमच्यात काहीतरी सुरु आहे.'जेव्हा नगमासोबत अफेयर्सच्या बातम्या पसरल्या होत्या, तेव्हा मनोज तिवारी आणि रवी किशन या दोघांचं लग्न झालं होतं. सध्या त्या लोकसभेच्या सदस्या आहेत. तेव्हाच नगमा यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजकारणात प्रवेश केला होता. तिने यूपीमध्ये खासदार म्हणून निवडणूक लढवली होती पण तिचा पराभव झाला होता.

  • FIRST PUBLISHED :