मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपली छाप पाडली आहे.
सई ताम्हणकर नेहमीच यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते.
नुकतंच सईने महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या खाजगी आयुष्याबाबत असा एक खुलासा केला की ऐकून सर्वच सुन्न झाले आहेत.
या मुलाखतीमध्ये सईला विचारण्यात आलं होतं की, खाजगी आयुष्यातील दुःखद, नैराश्य या गोष्टींचा तुझ्या व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होतो का?'
या प्रश्नाचं उत्तर देत सईने एक असा प्रसंग सांगितला जो ऐकून कुणाच्याही अंगांवर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
प्रश्नाचं उत्तर देत सई म्हणाली हो असं नेहमी होतं. खाजगी आयुष्याचा व्यावसायिक जीवनावर आणि व्यावसायिक आयुष्याचा खाजगी जीवनावर परिणाम होतोच. यामध्ये तारतम्य ठेवणं फारच कठीण आहे.
सई म्हणाली, 'मी जेव्हा हाय काय नाय काय' सिनेमाचं शूटिंग करत होते त्याचवेळी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं.
मी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि मला दुसऱ्याच दिवशी शूटिंगव्रर जावं लागलं होतं.
सांगायचं म्हणजे हा सिनेमा विनोदी होता मनात इतकं दुःख ठेवून सेटवर आपल्याला विनोदी सीन द्यावे लागल्याचं सईने सांगितलं आहे.