अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं.
सध्या ही अभिनेत्री वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे.
श्रियाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये अभिनेत्री स्पेनमध्ये आपल्या सुटटीचा आनंद घेताना दिसून येत आहे.
श्रिया मराठीतील दिग्गज कलाकार सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया यांची लेक आहे.
एक स्टारकिड असूनसुद्धा श्रियाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
ती स्वतः च्या अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंदी,मराठी,साऊथ,अशा भाषेत उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
श्रियाने नुकतंच युट्युबर भुवन बामसोबत आपल्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग पूर्ण केलं आहे.