रुबिना दिलैक ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
यावेळी देखील तिनं असंच एक चकित करणारं फोटोशूट केलं आहे.
खरं तर हे फोटोशूट ग्लॅमरस कमी आणि विचित्र अधिक वाटतंय त्यामुळं नेटकरी तिला सध्या ट्रोल करत आहेत.
या फोटोंमध्ये रुबिनानं एखाद्या कोबीच्या भाजीप्रमाणं ड्रेस परिधान केला आहे. शिवाय तिनं डोक्यावर काही फुलं लावली आहे. या फुलांची तुलना नेटकरी फुलदानीशी करत आहेत.
अहो काकी भाजी किती रुपयां दिली? लोक बाल्कनिक भाज्या लावतात असं ऐकलं होतं पण हिनं तर अंगावरच भाज्या लावल्या आहेत. अशा आशयाचे कॉमेंट करुन काही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
रुबिना दिलैक बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळं चर्चेत आली होती.
बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये ती विजेती ठरली होती. तेव्हापासून ती सतत चर्चेत आहे.
येत्या काळात ती खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.