रोहित शेट्टी यांना बॉलिवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये गणलं जातं. त्यांनी इंडस्ट्रीला अनेक दमदार सिनेमे दिले आहेत.
सध्या रोहित शेट्टी आपल्या पहिल्या मराठी 'स्कुल, कॉलेज आणि लाईफ' सिनेमामुळे चर्चेत आहेत. यामध्ये तेजस्वी प्रकाश मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या रोहित शेट्टी आणि टीम सर्वत्र मुलाखती देताना दिसून येत आहेत.
नुकतंच रोहित शेट्टी यांनी आपल्या टीमसोबत लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली आहे.
यामध्ये त्यांनी आपला आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ कोणता याबाबत सांगितलं आहे.
या प्रश्नाचं उत्तर देत रोहित शेट्टीने म्हटलं, मला मुख्यत्वे ठेचा, झुणका आणि भाकरी खायला खूप आवडतं.
रोहितचं महाराष्ट्रीयन पदार्थांवरील प्रेम आणि त्याचं अस्खलीत मराठी पाहून सर्वच कौतुक करत आहेत.
रोहित शेट्टीने आपण दिग्दर्शक नसतो तर एक स्टंटमॅन असतो असंही यावेळी सांगितलं.