अभिनेता रितेश देशमुखनं मराठी चित्रपटांपासून ते हिंदी चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रितेशनं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. चाहत्यांच्या मनात एक घर केलं आहे.
रितेश हा सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसोबत अनेक मजेशीर व्हिडीओ, पोस्ट शेअर करत असतो. याशिवाय तो त्याची बायको जेनेलियासोबतही अनेक भन्नाट रील शेअर करतो.
सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे रितेशसोबत चाहतेही कायम कनेक्ट राहतात. अशातच रितेशनं नवं फोटोशूट केलं असून हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
नव्या फोटोंमध्ये रितेशनं आकाशी कलरचा पोशाख परिधान केला असून त्याच्या या लुकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
या फोटोंसोबत रितेशनं लक्षवेधी असं कॅप्शनही दिलं आहे. 'शेवटी आपण संधीचं सोनं न केल्याचा खेद व्यक्त करतो', असं रितेशनं म्हटलं आहे.
रितेशच्या नव्या पोस्टवर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस आणि कमेंटचा भडिमार होताना दिसत आहे.
'सुपर हॅन्डसम, लुकिंग ऑसम, हर्ट इमोजी, फायर', अशा अनेक प्रकारच्या कमेटं येत आहेत.
रितेश देशमुखने 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. तेव्हापासून त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. दिवसेंदिवस त्याची लोकप्रियताही वाढत चालली आहे.