'हम आपके है कोन' मधून सलमान खानच्या वहिनीच्या रुपात मराठमोळ्या अभिनेत्री रेणुका शहाणे प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि हावभाव प्रेक्षकांना आजही भुरळ पाडतात.
नुकतंच रेणुका शहाणेंनी आपल्या खाजगी आयुष्याबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. यामध्ये त्यांनी आपल्या पहिल्या घटस्फोटाबाबत आणि दुसऱ्या लग्नाबाबतही गप्पा मारल्या.
पिंकव्हीलाला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या, 'माझे आईवडील जेव्हा विभक्त झाले त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर पडला. तेव्हा आजूबाजूचे लोक आपल्या मुलांना माझ्यासोबत खेळण्यापासून रोखायचे.
इतकंच नव्हे तर शिक्षकांनीही माझ्यासोबत असंच काहीसं केलं होतं. त्रिभंगामध्ये त्या चिमुकल्या मुलीसोबत जो सीन घडतो, ज्यामध्ये तिला तिच्या आईबद्दल विचारलं जातं, ते खरोखर माझ्या आयुष्यात घडलं आहे.
रेणुका यांनी आपल्या पहिल्या लग्नाबाबत बोलताना सांगितलं, माझं पहिलं लग्न विजय केंकरेसोबत झालं होतं. आमचा घटस्फोट झाला.
त्यांनतर त्यांचं लग्नाविषयी फारसं चांगलं मत नव्हतं. कारण आधी आईबाबांचा घटस्फोट आणि आता आपला.
अशातच आपण आशुतोष राणांच्या प्रेमात पडल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. परंतु दुसऱ्या लग्नावेळी माझं वय ३५-३६ झालं होतं. त्यावेळी मी नात्यातील चढ उत्तरांना चांगल्या प्रकारे हाताळू शकत होते. असंही त्या म्हणाल्या.
आपण गाजावाजा न करता मंदिरात अगदी साध्या पद्धतीने लग्न केल्याचं रेणुका यांनी सांगितलं. रेणुका आणि आशुतोष यान दोन मुले आहेत.