बॉलिवूड अभिनेत्री रेखा आज वयाच्या 68 व्या वर्षीही सौंदर्याच्या बाबतीत नवोदित अभिनेत्रींनाही टक्कर देतात. रेखा यांनी एकेकाळी मोठ्या पडद्यावर बॅक टू बॅक हिट चित्रपट देत लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं.
एक काळ असा होता की, प्रत्येक मोठ्या दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटात रेखाच नायिका म्हणून हव्या होत्या.
रेखा आज चित्रपटांपासून दूर आहेत. त्यांचा कोणताही व्यवसाय नाही. पण आजही त्या आलिशान आयुष्य जगतात. अनेकांना हा प्रश्न पडतो की, त्यांच्या या रॉयल लाइफस्टाइलमागील रहस्य काय आहे? किंवा त्यांची एकूण संपत्ती किती आहे?
रेखा यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रेखा सध्या चित्रपटांपासून दूर असल्या तरी संपत्तीच्या बाबतीत त्या अनेक अभिनेत्रींना मागे टाकतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार रेखा यांची मुंबईसह हैद्राबादमध्येही मोठी संपत्ती आहे. ती त्यांनी भाड्याने दिली आहेत. रेखा यातून भरपूर कमाई करतात.
याशिवाय त्यांच्याकडे महागडे दागिने आणि डिझायनर साड्यांचं प्रचंड मोठं कलेक्शन आहे. ज्याची किंमत अफाट आहे.
रेखा राज्यसभेच्या खासदारही होत्या. त्यामुळे त्यांना पेन्शन आणि इतर अनेक भत्तेही मिळतात.
रेखांना जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा स्टोअर ओपनिंगसाठी बोलावलं जातं तेव्हा त्या यासाठी मोठी रक्कम आकारतात.
रेखाला गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्यांच्याकडे AUDI A3 कार आहे. ज्याची किंमत 36 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू आणि एक्सयूव्हीही आहे. याशिवाय रेखाकडे 14 लाखांची होंडा सिटी कारदेखील आहे. शिवाय त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या कार आहेत.
रेखांची एकूण संपत्ती 331 कोटी रुपये आहे. एका मुलाखतीदरम्यान रेखाने सांगितलं होतं की, त्या खूप विचारपूर्वक पैसे खर्च करतात आणि जास्तीत-जास्त पैसे वाचवण्यावर विश्वास ठेवतात.